इमाम बादशहा दर्गा परिसर कब्रस्तानातील गवताला आग

0
99

नंदुरबार : शहरालगत असलेल्या इमाम बादशहा दर्गा परिसरातील कब्रस्तानात अचानक आग लागली.स्थानिक नागरिक व नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले.

aa00b801 326d 4ff5 974a 4fcad52ee5d1

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार शहरा लगत असलेल्या इमाम बादशहा दर्गा परिसरातील कब्रस्तानात मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले होते. या गवताला आग लागल्याने संपूर्ण परिसरात वनवा पेटला होता.कब्रस्तान परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. लागलेल्या आगीत या परिसरातील वनसंपत्तीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे. आग कशी लागली याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे; मात्र याबाबत प्रशासनाकडून तपास केला जात आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

कब्रस्तान परिसरात वनवा पेटल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व नंदुरबार नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उन्हाची तीव्रता व हवेमुळे मोठ्या प्रमाणावर आगीचा फैलाव झाला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याचा फवारा मारून आगीवर नियंत्रण मिळविण्यास काही प्रमाणात यश आले आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here