नंदुरबार -१०/४/२३
धडगांव तालुक्यातील नर्मदा नदी किनारी अतिदुर्गम आदिवासी डोंगराळ भागात व धडगांव पासून ४० किलोमीटर अंतरावर वसलेले भुषा या गावात कोणतीच सुविधा नव्हती ..
स्वातंञ्यानंतर ७२ वर्षात प्रथम महाराष्र्ट राज्य विज वितरण महामंडळ विभागा मार्फत प्रथम गावात विज पोहचली. .
भुषा हे गाव काही वर्षा पासून रस्ते, पाणी, आरोग्या, शिक्षण, विज आदी सोयी- सुविधा पासून वंचित असले तरी भुषा गावाकडे स्थानिक प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधीनी लक्ष दिले नसल्यामुळे गाव विकासापासून कोसो दूर होते ..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
गावातील युवकांनी धावत्या युगात उच्च शिक्षण घेतल्यामुळे गाव विकास होण्यास सुरवात झालेली दिसून येतेय ..
भुषा गावातील खुटालीपाडा-१, खुटालीपाडा-२, हकतारा, विहिरपाडा, विमानतळपाडा, ओकायापाडा, भुषा पाॅंईट आदी पाड्यावरील ३० ते ४० लाभार्थ्यांना विजेचा लाभ होईल.
डि.पी ( ट्रान्सफाॅंमर ) विद्युत रोहिञचे उदघाटनावेळी उपस्थिती मा.कुशाल कुल्ला पावरा सरपंच भुषा, जाड्या पावरा सरपंच माळ, लाला पावरा, नटवर पांडुरंग पावरा, दारख्या पावरा, फोपा पावरा कारभारी, मेरसिंग पावरा, बोठड्या मालसिंग पावरा, किसन अरविंद पावरा, कसा पावरा, पंडित पावरा, जेमा पावरा, गुमान खर्डे, युवराज पावरा, सुरत्या पावरा, किर्ता पावरा वायरमन आदी ग्रामस्थ उपस्थित होते.. गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले ..
गोपाल पावरा ,धडगांव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..