अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. गाभाऱ्यात रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली असून, त्याची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.( Photo Of Ram Lalla Idol )

रामलल्लाची मूर्ती ( Ram Lalla Idol ) कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज ( Arun Yogiraj ) यांनी तयार केली आहे. ही मूर्ती कृष्णशिला दगडात कोरीव काम करून तयार करण्यात आली आहे. मूर्तीची उंची ५१ इंच असून, वजन २०० किलो आहे.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

रामलल्लाची मूर्ती पाच वर्षांच्या बालरूपात आहे. भारतात सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुलाची उंची ही ५१ इंच असते. तसेच, ५१ हा शुभ अंक मानला गेला आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन स्थापन करण्यात येणारी मूर्ती ५१ इंच आहे.

- Trump Vs Modi : एका फोन कॉलची किंमत ५००% टॅरिफ? मोदी-ट्रम्प यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ सुरू..!
- Maharashtra Expressway – ‘समृद्धी’नंतर महाराष्ट्राला मिळणार ‘पुणे-बंगळूर’ ग्रीन फील्ड…!
- Shreyas Iyer ची प्रकृती चिंताजनक सिडनीतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू..!
- देशाचे ५३ वे सरन्यायाधीश कोण ? CJI Gavai यांनी सुचवले मोठे नाव..
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Schools चा मोठा निर्णय! एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश-विदेशातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे थेट प्रसारण दूरदर्शनवर करण्यात येणार आहे.
रामलल्लाची मूर्ती ५१ इंची का?

रामलल्लाची मूर्ती ५१ इंची उंचीची ठेवण्यात आली आहे. कारण भारतात सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुलाची उंची ही तितकीच असते. तसंच ५१ हा शुभ अंक मानला गेला आहे. त्यामुळे मंदिरात प्राणप्रतिष्ठा करुन स्थापन करण्यात येणारी मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीची निर्मिती शाळीग्राम या दगडात कोरीव काम करुन करण्यात आली आहे. हिंदू देव-देवतांच्या मूर्ती या खासकरुन शाळीग्राम दगडापासूनच तयार केल्या जातात.