कराड/सातारा -११/४/२३
सध्या राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत.
यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला आहे. तसेच फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे.
यामध्ये द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.राज्यात पुढचे पाच दिवस गारपीट, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारपीट अजून पाच दिवस कायम राहणार असल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट, तर कोकण आणि विदर्भात पावसाची थोडीसी उघडीप राहील. राज्यात 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहणार आहे.
उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात 15 एप्रिलपर्यंत केवळ अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून विजांचा कडकडाट, वादळी वार्यामुळे गारपीट आणि पाऊस पडत आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस जास्त आहे. कोकणात पडत असलेला पाऊस थोडासा कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण-विदर्भात 2-3 दिवस पावसाची उघडीप असेल.
संतोष गाडे ,कराड तालुका प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज