नंदुरबारात भाजपाच्या स्थापना दिनी ध्वजारोहण

0
123

नंदुरबार- येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षाचा ध्वजारोहण कार्यक्रम झाला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिभाषण व्हिडीओ कॉन्फरन्स कार्यक्रम पाहण्यात आला.

5b83cf98 d3e8 4bc2 b3bd 95fdb83536e2

नंदुरबार येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भाजपा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणासह अभिभाषण व्हिडीओ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, भाजपाचे महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, खा.डॉ.हिना गावित यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जिल्हा भाजपा कार्यालयाच्या प्रांगणात पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिभाषण व्हिडिओ कॉन्फरन्स पाहण्यात आले. देशात, राज्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात भाजपाची सत्ता असून विकास कामांसाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे. भाजपाची सत्ता जिल्हा परिषदवर देखील सत्ता असून जिल्हा परिषदेमार्फत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. भाजप पक्षाकडून देशापासून तर गाव पातळीपर्यंत विकासासाठी महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत आहे. यावेळी भाजपा स्थापनानिमित्त पक्ष कार्याची माहिती देण्यात आली.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here