आदर्श आश्रमशाळेच्या प्रवेशासाठी,2 एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन..

0
142

नंदुरबार: २९/३/२०२३

एकात्मिक आदिवासी‍ विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची आदर्श आश्रमशाळा देवमोगरा ता.नवापूर येथील निवासी शाळेत सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा रविवार 2 एप्रिल,2023 रोजी होणार असल्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सदर प्रवेश पूर्व परीक्षा रविवार 2 एप्रिल,2023 रोजी सकाळी 11 ते 12-30 या वेळेत शासकीय आश्रमशाळा शिर्वे ता.तळोदा जि.नंदुरबार या परीक्षा केंद्रावर होईल.

परीक्षा भाषा व सामाजिक शास्त्रे, गणित, बुद्धीमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान या अभ्यासक्रमांवर होईल.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी एक तास आधी उपस्थित राहावे.

विद्यार्थ्यांनी स्वत:चे शासन प्रमाणित ओळखपत्र किंवा आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असतील अशाच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल.

विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत केवळ 1 पेन, पाणी बॉटल, तसेच परीक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक साहित्य आणावे.

पर्यवेक्षकांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील.

कोणताही विद्यार्थी परीक्षा देतांना गैरप्रकार करतांना आढळल्यास विद्यार्थ्यांला परीक्षेस अपात्र करण्यात येईल, असे एकात्मिक प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी पत्की यांनी कळविले आहे.

प्रविण चव्हाण, एम. डी. टी.व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here