पंजाबराव डख यांनी वर्तविला अंदाज : असा राहणार यंदाचा पावसाळा

0
129
forecast-by-punjabrao-dakh-this-will-be-the-monsoon-this-year

मे महिन्यात अवकाळी तर जून महिन्याच्या ‘या’ तारखेला होणार मान्सूनची एन्ट्री !

यंदाच्या मान्सून बाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत. यंदा दुष्काळ पडेल असा अंदाज काही तज्ञांनी वर्तवला असून अमेरिकन हवामान विभागाने देखील यावर्षी भारतासह संपूर्ण आशिया खंडात दुष्काळाचे संकेत दिले आहेत.अशातच पंजाबराव डख या परभणीच्या हवामान तज्ञाचा अंदाजानुसार यावर्षी मी महिन्यात दोनवेळा अवकाळी पाऊस होणार असून ८ जूनला महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री होऊन २२ जूनपासून राज्यभरात मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

पंजाबराव डख या परभणीच्या हवामान तज्ञाचा मान्सून २०२३ चा अंदाज समोर आला आहे. अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित एका पत्रकार परिषदेत पंजाबराव डख यांनी यावर्षीच्या मान्सूनबाबत एक मोठी माहिती दिली आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीचा मान्सून हा समाधानकारक राहणार आहे. गेल्या वर्षी ज्या पद्धतीने समाधानकारक पाऊस पडला तसाच पाऊस यंदा म्हणजेच २०२३ च्या मान्सून मध्ये पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

मान्सून २०२३ बाबत माहिती देताना डख यांनी सांगितले की, यावर्षी आठ जूनला महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन अर्थातच एन्ट्री होणार आहे. तसेच मान्सूनची एन्ट्री झाल्यानंतर २२ जून पासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर जून अखेरपर्यंत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणी आटोपली जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी जून महिन्यापेक्षा जुलैमध्ये आणि जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अधिक पाऊस राहणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

एप्रिल आणि मे महिन्यातील हवामान कसे राहील

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ११ ते १३ एप्रिलपर्यंत उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता असंणार आहे. यानंतर १३ ते १५ एप्रिलपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. मात्र १६ ते १८ एप्रिल पर्यंत राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता असेल. एवढेच नाही तर मे महिन्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.  
एम.डी.टी.व्ही. न्यूज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here