आमदार राजेश पाडवींच्या प्रयत्नातून शहर विकासाला चालना
नंदुरबार :- राज्य शासनाच्या नगरविकास विभाग वैशिष्ट्येपूर्ण योजनेतून शहादा शहरातील विविध प्रभागातील विकास कामासाठी ८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांचे भूमिपूजन आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नांतून शहरातील विविध भागात विकास कामांसाठी शासकीय योजनांतून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पालिका हद्दीतील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मजबूतीकरणासह ओपन प्लेस सुशोभीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे, संरक्षक भिंत आदि कामांसाठी पाठपुरावा केला जात होता.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शासनाच्या वैशिष्ट्ये पूर्ण योजनेतून सुमारे आठ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामांचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. यावेळी आ.राजेश पाडवी यांच्यासह भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित, शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, विद्यमान संचालक मयूर दीपक पाटील, भाजपाचे तालुका कार्याध्यक्ष डॉ.किशोर पाटील, शहराध्यक्ष विनोद जैन, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, माजी नगरसेवक के.डी.पाटील, सुपडू खेडकर, राकेश पाटील, एकनाथ नाईक, राजाराम पाटील, श्रीराम पाटील, सौ.शोभाबाई जैन,सौ.पुष्पा भावसार,सौ.संगिता पाठक, रमाशंकर माळी, प्रदीप ठाकरे, गोपाल गांगुर्डे, कार्तिक नाईक आदिंसह त्या-त्या प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती.
भूमिपूजन प्रसंगी बोलतांना आमदार राजेश पाडवी म्हणाले की, अजुनही शहरातील विविध भागांतील विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू आहे. पालिकेवर प्रशासक राज असले तरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. स्थानिक रहिवाशी व नागरिकांनी आमदार कार्यालयात संपर्क साधावा.आपल्या योग्य मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी मकरंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश सदस्य तथा चेअरमन, सातपुडा साखर कारखाना दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर तालुक्यातील ग्रामीण भागातील रहिवाशांना सोयी सुविधा पुरवणे आमची जबाबदारी आहे व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मकरंद पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमास शहरातील भारतीय जनता पार्टी मोर्चा,आघाडी पदाधिकारी,कार्यकर्ते,आजी माजी नगरसेवक, स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजन भाजपा शहर अध्यक्ष विनोद जैन, आमदार कार्यालयातील कर्मचारी यांनी केले होते.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, शहादा-नंदुरबार