शिरपूर येथे त्रिरत्न विपश्यना केंद्राचे भूमिपूजन

0
293

शिरपूर : येथे भव्य त्रिरत्न विपश्यना केंद्राचे १ मे रोजी भूमिपूजन करण्यात आले. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.

पूज्य भिक्खू सुमेध (औरंगाबाद) यांनी सामूहिक वंदना घेतली.

जगाला शांती व समतेचा संदेश देणारे, तथागत सिध्दार्थ गौतम बुध्द यांच्या बौध्द अनुयायांसाठी, भव्य त्रिरत्न विपश्यना केंद्राचे भूमिपूजन माजी मंत्री शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी

आमदार काशिराम पावरा, उपजिल्हाधिकारी तथा शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी सत्यम गांधी, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, तहसीलदार महेंद्र माळी, शिरपूर शहर पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर, पूज्य भिक्खू सुमेध औरंगाबाद, नगरपरिषद अभियंता माधवराव पाटील, गोपाल भंडारी, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील,

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

श्यामकांत ईशी, संजय चौधरी, सुनिल सोनवणे, माजी नगरसेवक पिंटू शिरसाठ, माजी नगरसेवक गणेश सावळे, सामाजिक कार्यकर्ता विनायक वाघ, माजी नगरसेवक बाबुराव खैरनार, भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्ष अशोक लहु ढिवरे, अॅड. युवराज ठोंबरे, माजी नगरसेवक सुरेश अहिरे, न.पा. शिक्षण मंडळ माजी उपसभापती अनिल आखाडे, सामाजिक कार्यकर्ता रमेश वानखेडे, प्रताप सरदार, दशरथ भील, किशोर माळी, प्रा. राजू पवार, पंकज थोरात, गोविंदा खैरनार, अनिल बाविस्कर, नरेंद्र पाटील, किरण कढरे, अशोक माथने, ब्रिजेश थोरात, विनोद पाटील, पंडित पाटील, राजेंद्र थोरात, त्रिरत्न विपश्यना केंद्राचे वास्तू रचनाकार अभियंता अविनाश थोरात, अविनाश खैरनार, शौकीन कुवर, प्रा. इंदासे, बंसीलाल शिरसाठ, मुलचंद शिरसाठ, गोविंदा थोरात, समस्त आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण म्हणाले, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भूपेशभाई पटेल नगराध्यक्ष असताना बौद्ध विहार निर्मिती झाली होती.

आता आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा यांनी शासना कडून १.५० कोटी रुपये आर्थिक निधी मंजूर केला असून त्यातून अद्ययावत बौद्ध विहार बनविण्यात येत आहे.

खान्देशात आदर्श बौद्ध विहार बनेल व शिरपूरच्या विकासात व सौंदर्यात भर पडणार आहे.

त्रिरत्न विपश्यना केंद्र हे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांसाठी प्रेरक असे ऊर्जा स्थान ठरेल असे विचार याप्रसंगी मांडले.

विनायक वाघ यांनी प्रास्ताविकात आमदार अमरिशभाई पटेल यांनी विपश्यना केंद्राच्या नवनिर्मिती-बांधकाम साठी १ कोटी ५० लक्ष रुपये एवढा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

त्रिरत्न विपश्यना केंद्र विषयी भूमिका त्यांनी प्रास्ताविकेत मांडली.
कृषी उत्पन्न बाजार समिती नवनिर्वाचित सदस्य किरण कढरे यांचा समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

कार्यक्रमास कल्पेश थोरात, हंसराज कढरे, गोविंदा थोरात, प्रबुद्ध नागरिक उपस्थित होते.

नवल कढरे. एम.डी.टी.व्ही. न्युज ,शिरपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here