पोलिस असल्याची बतावणी करुन फसवणूक

0
142

१ लाख ६३ हजाराचे सोन्याचे दागिने नेले चोरुन

69350416

नंदुरबार : शहरातील जिजामाता कॉलेज जवळील बसस्टॉपजवळ व शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावर पोलिस असल्याची बतावणी करुन फसवणूक करुन सुमारे १ लाख ६३ हजाराचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नंदुरबार शहरातील जिजामाता कॉलेजवळील बस स्टॉपजवळ सुरेश फुंजीलाल वाणी यांना दोन अनोळखी इसमांनी पोलिस असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडील रुमालमध्ये ठेवलेली ६३ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी व चेन काढून घेवून फसवणूक केली. याबाबत सुरेश फुंजीलाल वाणी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र दाभाडे करीत आहेत.

तसेच शहादा शहरातील श्रीराम कॉलनी येथील सुरेशचंद्र सोनराज जैन यांना शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावर दोघा अनोळखी पुरुषांनी पोलिस असल्याची बतावणी करुन दोन सोन्याच्या अंगठ्या व १ सोन्याचे ब्रासलेट असा १ लाख रुपये किंमतीचे दागिने काढून घेवून फसवणूक केली. याबाबत सुरेशचंद्र सोनराज जैन यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात भादंवि कलम ४२०, १७०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माया राजपूत करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here