नाशिक -१४/४/२३
भगवान परशुरामांनी सनातन धर्माच्या संवर्धनाचे कार्य केले होते. राजांकडून होत असलेले अधर्म आणि पाप संपवण्यासाठी परशुरामांचा जन्म पृथ्वीवर झाला असे मानले जाते.
पौराणिक कथेनुसार भगवान परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार मानला जातो.
त्यांचा जन्म वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला झाला.
यावर्षी भगवान परशुरामांची जयंती 22 एप्रिल 2023 रोजी शनिवारी साजरी केली जाईल.
अक्षय तृतीयेचा सणही याच दिवशी साजरा केला जातो.
भगवान परशुरामांनी सनातन धर्माच्या संवर्धनाचे कार्य केले होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
राजांकडून होत असलेले अधर्म आणि पाप संपवण्यासाठी परशुरामांचा जन्म पृथ्वीवर झाला असे मानले जाते.
या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्यास विशेष फल प्राप्त होते. महादेवाचे परम उपासक असल्यामुळे परशुरामजींना रुद्र शक्ती असेही म्हणतात.
अनेक योग येत आहेत जुळून
परशुराम जयंतीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
सालाबादप्रमाणे यंदाही 22 एप्रिल रोजी सकाळी 7:30वाजता अक्षय तृतीये च्या दिवशी म्हणजेच भगवान श्री परशुराम जन्मोत्सव ला गंगापूर रोड परिसरातून भगवान श्री परशुरामांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे..
मिरवणूक मार्ग याप्रमाणे असेल :
नरसिंह नगर मारुती मंदिर,दाते नगर,मॉडर्न मार्केट चौक,शांती निकेतन चौक,प्रसाद मंगल कार्यालय,तुळजा भवानी मंदिर, गीतांजली सोसायटी,नारायण काका ढेकणे महाराज मठ,श्रीरंग नगर येथे समारोप करण्यात येईल ..
याबाबत आयोजनाविषयी माहिती दिलीय बापू कोतवाल यांनी ..
तर या संपूर्ण शोभायात्रेचा मार्ग कोणता असेल यासोबत किती समाजबांधव सहभागी होतील याबाबत सचिन दीक्षित यांनी सविस्तर सांगितलंय ..
प्रत्येक शोभा यात्रेत महिला वर्गाचा सहभाग तेवढाच महत्वाचा मानला जातो म्हणून त्यांना आव्हानात्मक अपील केलंय वृषाली लळींगकर यांनी ..
तर शोभायात्रेत सक्रिय सहभागी होऊन मी एक रणरागिणी असून तेवढ्याच बरोबरीने एक दिवस परशुरामांसाठी या भावनेतून महिलांनी एकत्र यावे असे आवाहन प्रिया भिडे यांनी केलंय ..
कोणताही सामाजिक धार्मिक कार्यक्रम त्याला भक्कम बाजू लागते ती आर्थिक जोडीची त्या शोभायात्रेसाठी दानशूरांनी आणि ब्रह्मवृंदांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलंय समितीचे योगेश बक्षी यांनी ..
एकूणच सर्व ब्राह्मण समाजासह समाजबांधवांनी एकजुटीने संघटन में शक्ती हे दाखवण्याची यानिमित्ताने संधी असून २२ एप्रिल रोजी होणाऱ्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गंगापूर रोड शाखा परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे करण्यात आलंय ..
यावेळी समितीचे पदाधिकारी यांच्यासह बापू कोतवाल,सचिन दिक्षित,योगेश बक्षी,अरुण कुलकर्णी,वृषाली लळींगकर,मयूर मेघश्याम,प्रिया भिडे,स्वाती उपासनी आदी मान्यवर उपस्थित होते ..
तेजस पुराणिक ,नाशिक जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज