गौरव कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महा. : इ १२ वि. चा १००% निकाल जाहीर,मुलींनी मारली बाजी

0
718

नंदुरबार -२५/५/२३

नुकताच आज ऑनलाईन १२वि चा निकाल जाहीर झाला ..
नंदुरबार जिल्ह्यातील विद्या सहयोग बहुउद्देशीय संस्था तळोदा संचलित, गौरव कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आमलाड येथील महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक महामंडळ तर्फे मार्च २३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण ५० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते
सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने महाविद्यालयाचा १००% निकाल लागला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यात महाविद्यालयात प्रथम क्रमांक कु.बुनकर तन्वी दिनेश, द्वितीय क्र. आघाडे दिव्या निखीलकुमार तर तृतीय क्र. पाडवी पूजा सरदार यांनी मिळवला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.विद्यादेवी तांबोळी , मार्गदर्शक श्री अशोक तांबोळी, ललित पाठक, विश्वास पवार यांच्यासह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here