शिरपूर येथे प्रशासनास आंबेडकरी जनतेची निवेदनाद्वारे मागणी
शिरपूर :- नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या गावात अक्षय भालेराव या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याने अक्षयची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरवादी जनतेतर्फे करण्यात आली आहे. याविषयी नगरसेवक गणेश सावळे व नगरसेवक पिंटू शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर व नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांना निवेदन देण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
अक्षय भालेराव यांच्या हत्येचा आणि बोंढार गावातील वस्तीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, भालेराव यांच्या कुटुंबाला शासनाने ५० लाख रूपये आर्थिक मदत तत्काळ द्यावी व आरोपीची मालमत्ता जप्त करुन मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना देण्यात यावी.
भालेराव यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करावे, या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी.
अक्षय भालेराव याच्या कुटुंबियास तात्काळ कायम स्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे. भालेराव खून प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून पुन्हा असा गुन्हा कोणी करू नये, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी नगरसेवक गणेश सावळे, नगरसेवक पिंटू शिरसाठ, ज्वाला मोरे, सुनील बैसाणे, रमेश वानखेडे, किरण कढरे, बापू इंदासे, योगेश पवार, कपिल मोरे, प्रवीण शिरसाट, प्रा.अरुण पवार, अशोक ढिवरे, राहुल पवार, भिकन मोरे, पत्रकार नवल कढरे, मुकेश सैंदाणे, पनीराज बैसाणे, हिंमत शिरसाट, राकेश थोरात, नाना करंकाळ यांच्यासह शहरातील आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवल कढरे. एम.डी.टी.व्ही. न्युज शिरपूर.