GONDGAV:हिंस्त्र प्राण्यांनी साजरी केली गटारी अमावस्या..

0
662

भडगाव /जळगाव 17-7-23

गोंडगाव गावात संतोष अभिमान पाटील यांच्या राहत्या घरी शेजारी बकऱ्यांची शेळ आहे.. त्यावर 15 जूनच्या रात्री दोन अडीच च्या सुमारास हिंस्त्र प्राण्यांनी पाच बकऱ्यांना ठार केलं.. त्यांना ठार करून गटारी अमावस्या साजरी केली.. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, संतोष पाटील यांनी रात्री दहा साडे दहाच्या सुमारास आपल्या घरासमोरील बकऱ्यांना पाणी देऊन गोठ्यात बंदिस्त केले. सकाळी बघता बघता पाचही बकऱ्या ठार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले..

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणिजॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा : Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..

MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…

1

त्याबाबत त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती करून दिली आणि त्याबाबत तक्रार दाखल केली.. त्याबाबत वनविभागाच्या अधिकारी ठाकरे मॅडम स्वतः घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आल्या.. पाहणी करून त्यांना निदर्शनास आले की हा हल्ला एखाद्या बिबट्या किंवा तळस प्राण्याचा नसून लांडगे किंवा कोल्ह्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला. पाटील कुटुंब गेल्या 40 ते 50 वर्षापासून शेळ्यांचा व्यवसाय करीत असून त्यांचे एवढे नुकसान कधीच यापूर्वी झाले नव्हते. पाच बकऱ्या दगावल्याने साधारणता या कुटुंबाचा पन्नास ते साठ हजाराचे नुकसान झालं असून शासनाने त्यांना त्वरित मदत करावी यासह आर्थिक मदत करण्याची मागणी पत्रकार सतीश पाटील व शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय साळुंखे यांनी केली आहे.. या अशा प्राण्यांचा ताफा दाखल झाल्याने पशु प्राणी मालक व नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. त्वरित पशुधन मालकांनी आपले पशुधन दुसऱ्या ठिकाणी हलवून बांधण्याची व्यवस्था करण्याचे भावनिक आवाहन त्यांना करण्यात येत आहे.
सतीश पाटील ,भडगाव तालुका प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here