तळोदा /नंदुरबार -५/७/२३
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांच्या संकल्पनेतून व जिल्हा समदेशक यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून पावसाळयात वाहतुकीस अडथळा होणाऱ्या दगड, गोटे, मातीचा मलबा साफ करण्यात आला. मागील महिन्यात चांदसैली घाटात वळण रस्त्यावरुन मालवाहतुक करणारी जीप ड्रायवरचा ताबा सुटल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. पावसाळयात मातीचे मलबे रस्त्यावर येत असतात.वाहनधारकांना याची डोकेदुखी होत असते.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुद्धा वाचा :
GOOD NEWS:कोंडलेल्या स्मारक चौकाचा श्वास अखेर झाला मोकळा..
Ajit Pawar बनले राज्याचे नवे उपमुख्यमंत्री …
पोलीस अधीक्षक पी आर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे उपस्थित होते.
श्रमदान संकल्पना यशस्वीतेसाठी सहा पथक तयार करण्यात आले.
सुमारे सात किलोमीटर घाट मधील पावसामुळे रस्त्यावर दगड, गोटे व माती ढासळून रस्ता अरुंद झाला आहे. वाहतूक सुरळीत व सुरक्षित होईल,अपघात टळतील,सुखमय प्रवास व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून पोलीस अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड व कोठार गावकऱ्यांच्या सहकार्यातून श्रमदान करण्यात आले.
तळोदा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार,अक्कलकुवा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, मोलगीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे, स्थानिक गुन्हा शाखेचे एपीआय संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल, अविनाश केदार आदींसह पोलीस कर्मचारी होमगार्ड श्रमदानात सहभागी झाले होते. कोठार सरपंच जंगलसिंग पाडवी, ग्रामपंचायत सदस्य गो.हू. महाजन हायस्कूलचे स्काऊट व एनसीसी युनिट तयार केले होते. गो.हू. हायस्कूलचे शिक्षक संकेत माळी ,पराग राणे ,सुमित लोखंडे आदीसह विद्यार्थी परिश्रम घेत होते.
नितीन गरुड ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज