Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….!

0
355

नंदुरबार :- नगरपालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी नंदुरबार पालिकेने या शैक्षणिक वर्षात नगरपालिकेतील १२ शाळांमधील पाच शाळांचे वर्ग खोल्या डिजिटल करण्यात आल्या आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

विद्यार्थ्यांनमध्ये शिक्षणाची आवड वाढावी म्हणून शिक्षक व सरकार वेगवेगळ्या शिक्षण पद्धती आजमावत असतात. एकविसाव्या शतकात शिक्षणाच्या पद्धती बदलत आहेत. सगळ काही डिजिटल होत आहे. याच बरोबर शिक्षणही डिजिटल होत आहे. नगरपालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, तसेच इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी नंदुरबार नगरपालिकेने या शैक्षणिक वर्षात नगरपालिकेतील १२ शाळांमधील पाच शाळांचे वर्ग खोल्या डिजिटल करण्यात आल्या आहेत.

हे सुध्दा वाचा

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW

सद्या इंग्रजी माद्यमाच्या शाळांमध्ये आपल्या मुलाला दाखल करण्यासाठी पालक स्पर्धा करू लागले असून लाखों रुपये फी भरताना दिसून येतात. दरम्यान, पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवत नसतात. नगरपालिकेच्या शाळांमध्ये आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण दिले जात असून याकडे मात्र पालक गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ होण्यासाठी आता पालिकेच्या शाळा सज्ज झाल्या आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नगरपलिकेच्या शाळांना डिजिटल बनवण्यासाठी मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी एचडीएफसी बँकेच्या सीएसआर फंडातून ४० लाखाची मदत मिळवली आहे. या निधीतून नगरपालिकेच्या १६ शाळांमधून ५ शाळांमधील प्रत्येकी एक खोली डिजिटल करण्यात आली आहे. एका खोलीला डिजिटल बनवण्यासाठी ८ लाख रुपये इतका खर्च झाला आहे.

हे सुध्दा वाचा

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW

या डिजिटल वर्ग खोल्यांमध्ये ६५ इंची डिजिटल टीव्ही, १० बेंच, कार्पेट देण्यात आले आहे. शिक्षण पद्धती डिजिटल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येतील असे मुख्याधिकारींनी सांगितले. पालिकेने येणाऱ्या वर्षात उर्वरित शाळा देखील डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकेच्या या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक केले जात असून विद्यार्थ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here