शेतकऱ्यांसाठी खुशखबर : राज्यात लवकरच दाखल होणार मान्सून

0
179

आगामी १० ते १२ दिवसात राज्यात काही भागात पावसाळा सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतातील आंतरमशागतीची कामे आटोपून घ्यावीत. २१ मे रोजी मान्सून अंदमान निकोबार मध्ये दाखल होत असून २६ मे नंतर मान्सून प्रगतीवर राहून त्याची राज्यभरात आगेकीच होईल, असा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. हा अंदाज शेतकऱ्यासाठी आशादायक आहे.

पंजाबराव डख यांनी म्हटले आहे की, सर्वात महत्वाचे की, राज्यात लवकरच मान्सूनची हजेरी लागणार असून शेतकऱ्यांनी तयारी करुन ठेवावी. १९ मे रोजी पासून राज्यात २१ मे पर्यंत अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

१० ते १२ दिवसात पावसाची सुरुवात होणार शेतकऱ्यांनी शेतातील कामे आटपून घ्यावेत. २१ मे आणि २२ मे रोजी अंदमान निकोबार मध्ये मान्सूनचे आगमन होणार असून त्यानंतर २६ मे आणि २७ मे रोजी मान्सून खुप प्रगतीच्या मार्गवर असणार आहे.

शेतकरी मित्रांनो, २१, २२, २३ आणि २४ मे पर्यंत मान्सून पूर्व भाग बदलत महाराष्ट्रात पावसाची हजेरी असणार आहे. पुढील तीन दिवस म्हणजे ३१ मे ते ३ जून पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. ८ जून पासून राज्यात मान्सूनची सुरुवात होईल असा अंदाज पंजाबराव यांनी सांगितला आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here