नंदुरबार :– नंदुरबार जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील पेसा क्षेत्र व नॉन पेसा क्षेत्राकरिता मेगा भरती होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल ४८८ रिक्त पदे भरण्याकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य ) यांनी दिली आहे.
राज्य शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे १५ ऑगस्ट २०२३ पुर्वी भरावयाची आहे. त्यात नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत गट क संवर्गांतील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (नॉन पेसा) आरोग्य सेवक (पुरुष /महिला ) औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता
(स्थापत्य ), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक (लिपिक /लेखा ) पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैद्यानिक अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी ), विस्तार अधिकारी (शिक्षण), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पर्यवेक्षिका, कनिष्ठ अभियंता या पदाचा समावेश राहील.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा ) आरोग्य सेवक (पुरुष /महिला ),कंत्राटी ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाची पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला असून यापदाची जाहिरात राज्यात एकाचवेळी प्रसिद्ध होणार आहे. या पदभरतीकरीता शासनस्तरावरुन दोन कंपन्याची निवड करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 488 रिक्त पदे भरण्यासाठी आबीपीएस कंपनीची निवड करण्यात आली असून पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.
विद्यार्थी, नागरिकांनी पदभरतीच्या जाहिरातीसाठी जिल्हा परिषदेच्या www.zpndbr.in या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी. तसेच कोणत्याही अफवांना अथवा गैरप्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार