Good News: शहाद्यात गुणवंतांसह मान्यवरांचा गुणगौरव समारंभ संपन्न..

0
895

शहादा/ नंदुरबार 17/7/23

बंजारा समाजाच्या उत्कर्षासाठी आणि प्रगतीसाठी भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था शहादा शाखा कार्यरत आहे. संत शिरोमणी सेवालाल महाराज व स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेतून अव्यहतपणे ही सेवा संस्था काम करते आहे. नुकताच जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्यात घेतलेल्या निर्णयानुसार नंदुरबार जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष 2021- 22 व 2022 23 या वर्षातील यशस्वी झालेले गुणवंत विद्यार्थी, इयत्ता दहावी बारावी आणि डिग्री च्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि पदोन्नती प्राप्त कर्मचारी अधिकारी यांचा गुण गौरव आणि सन्मान सोहळा शहाद्यात नुकताच पार पडला. सुरुवातीला संत शिरोमणी सेवालाल महाराज आणि स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं… शहादा तालुक्यातील बंजारा समाजातील यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी आणि पदोन्नती प्राप्त कर्मचारी अधिकारी यांचा देखील यात समावेश होता.

shahada.satkarsham.jpg1
1
2
3
4
5
6

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा : Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..

MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…

यावेळी सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत म्हटले की इतर समाजाच्या तुलनेने बंजारा समाज देखील विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. या समाजातील शाळा आणि महाविद्यालयीन तरुण तरुणांनी स्वतःला कमी न समजता विविध क्षेत्रात शैक्षणिक अभ्यास करणाऱ्या युवक युवतींनी स्वतःच्या प्रगती बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी झटत राहावे, आपल्या समाजाचा अभिमान आणि गर्व बाळगावा.. मी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. असे भावनिक आव्हान करत पुढील वाटचालीसाठी त्यांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून चेनसिंग राठोड, हिम्मत राठोड ठाणसिंग चव्हाण राजेश राठोड, शिवाजी चव्हाण हेमराज चव्हाण, रामसिंग चव्हाण,डॉक्टर राम जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक संजय जाधव, वर्षा संजय जाधव उपस्थित होते. यावेळी महिला भगिनींचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्रीयुत एस पवार यांनी केलं होतं. तर आभार पी एम जाधव यांनी मानले. हा सोळा यशस्वीतेसाठी प्रमोद भाऊसाहेब, आर डी राठोड,सुधाकर नाईक, वाय एस राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
श्याम पवार, शहादा प्रतिनिधी, एम डी टीव्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here