आनंदवार्ता : मान्सूनची केरळ मध्ये एंट्री ; या दिवशी होणार महाराष्ट्रात दाखल !

0
393

नंदुरबार : मान्सूनने काल ८ जून रोजी केरळ मध्ये एंट्री केली आहे. मान्सूनची आगेकूच सुरळीत सुरु राहिली तर पुढील ६ सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. उत्तर महाराष्ट्रात जूनच्या चौथ्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता नंदुरबारच्या कोळदा कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान पुढील दोन दिवसानंतर मान्सूनपूर्व हलका पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापमान काही अंशी कमी होऊन ३९ ते ४१ अंशावर राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हवामान विभागातर्फे सातत्याने मान्सून तीन चार दिवसांनी उशिरा पोहोचणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती, अशातच हवामान विभागाची शक्यता खरी ठरवून यावर्षी साधारणतः सात दिवसांनी उशीर झालेला आहे. त्यामुळे सर्वांची अपेक्षा लागुन आहे की मान्सून महाराष्ट्र मध्ये कधी दाखल होणार?

हे सुध्दा वाचा:

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

दरवर्षीच्या तुलनेमध्ये केरळमध्ये मान्सूनचे आगमन सात दिवसांनी उशिराने झालेले आहे, मानसूनने केरळमध्ये काल ८ जून रोजी प्रवेश केलेला असून दरवर्षीच्या अंदाजानुसार केरळ मधून महाराष्ट्रमध्ये मान्सूनचे आगमन होण्यासाठी साधारणतः सात दिवसांचा कालावधी लागतो.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शेतकऱ्यांकडून सतत त्यांनी मान्सून कधी दाखल होईल याची प्रतीक्षा लागून असते. मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकरी खरीपचप तयारी करतात.

हे सुध्दा वाचा:

ब्रेकिंग -अखेर भाकरी फिरवली..

ब्रेकिंग -महाराष्ट्रात रेल्वे अपघात..

मूर्ती विटंबना प्रकरणावरून धुळ्यात निषेध मोर्चा : हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

सध्याचे केरळमधील ढगाळ वातावरण यामध्ये वाढ झालेली असून मान्सून करिता पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर सध्या मान्सूनने केरळ, दक्षिण तमिळनाडू मंडळाचे आखात भागांमध्ये आगमन केलेले आहे, केरळ मधून महाराष्ट्र मध्ये मान्सूनला प्रवेश करण्यासाठी साधारण सात दिवस लागतात त्यामुळे वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये मान्सून १६ जूनपर्यंत प्रवेश करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे सुध्दा वाचा:

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

उत्तर महाराष्ट्रात जूनच्या चौथ्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता नंदुरबारच्या कोळदा कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान पुढील दोन दिवसानंतर मान्सूनपूर्व हलका पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापमान काही अंशी कमी होऊन ३९ ते ४१ अंशावर राहण्याची शक्यता डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या कोळदा ( ता. नंदुराबर ) कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञानी व्यक्त केली आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here