GOOD NEWS:विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क .. घेतला अनुभव लोकशाहीचा..

0
669

भडगाव /जळगाव -२८/७/२३

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे अभिनव उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये इयत्ता चौथी सेमी च्या विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी या उद्देशाने लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक घेऊन वर्ग मंत्री निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा सुरेख अनुभव मिळाला. मतदान दिनांक 26 जुलै 2023 वार-बुधवार रोजी घेण्यात आलं .. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून ऋषिकेश प्रवीण पाटील यांनी काम पाहिले. मतदान अधिकारी म्हणून कुशल निरंजन पाटील, कुणाल पंडित महाजन, सर्वज्ञ मनोज कासार यांनी काम पाहिले.

1
2


बुथ क्रमांक 1 एकूण मतदान 36 होते .. प्रत्यक्षात झालेले मतदान 33 सरासरी 91% मतदान झाले .. निवडणुकीच्या रिंगणात एकूण पाच उमेदवार होते. अनुष्का पाटील, दिव्या शिंदे, संचित पवार, श्लोक सोमवंशी, दुर्वा भोसले वरील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले .. संचित पवार हा सर्वाधिक मतांनी विजयी झाला. संचितची वर्ग मंत्री म्हणून निवड जाहीर करण्यात आली. शाळेच्या वतीने त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
सदर मतदान प्रक्रियेसाठी वर्गशिक्षक अनंत हिरे यांनी फलक लेखन केले . शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. भारतीय लोकशाही प्रक्रियेविषयी माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.
सतीश पाटील ,प्रतिनिधी ,भडगांव ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here