तळोदा /नंदुरबार -३०/६/२३
डोकेदुखी ठरलेली रहदारी आज अखेर मोकळी झाली ..तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व त्यांचा पथकाने स्मारक चौक व मेन रोडवरील रहदारीस अडथळा होणाऱ्या सर्व प्रकारचे विक्रेत्यांना हटवले. स्मारक चौक परिसर रहदारीस मोकळा झाला असल्याने वाहनधारक समाधानी आहेत.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आषाढी एकादशी व बकरी ईदनिमित्त शांतता कमिटीच्या बैठकीत रहदारी विषयी शांतता कमिटीच्या सदस्यांनी तक्रार/सूचना केल्या होत्या. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी लवकरच रहदारीचा समस्या सोडणे विषयी सांगितले होते. त्याअनुषंगाने आज शुक्रवारी तळोदा बाजार असल्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांना हटवले आहे.
सदर कारवाई करतेवेळी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, साहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, पोलीस नाईक अजय कोळी, पो.ना भतेंद्र साळुंखे,पो.ना विलास पाटील, पो.कॉ अनिल पाडवी,पो.कॉ शशिकांत अहिरे,पो.कॉ दिलीप वसावे उपस्थित होते
नितीन गरुड ,ग्रामीण प्रतिनिधी ,तळोदा एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार