Good News…नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी घेतला निर्णय…. ईदला बकरीची कुर्बानी नाही !

0
1322

नंदुरबार :- नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील हे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी, किरकोळ कारणातून दोन समाजात कटुता निर्माण न होता एकमेकांचे सण, उत्सव आनंदाने साजरे व्हावेत यासाठी कायम प्रयत्नशील आहेत. यासाठी बैठका, विविध कार्यक्रमातून त्यांनी व पोलिसांनी केलेल्या जनजागृतीचे फलित देखील नंदुरबारकर अनुभवू लागले आहेत. राज्यात किरकोळ कारणातून दोन गटात वादाच्या घटना होत असतानाच मात्र नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी एक धाडसी निर्णय घेतला आहे.

85859fd7 1013 408b 85d3 13264e4fc1f9

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

देशासह जगभरात येत्या २९ जूनला बकरी ईद साजरी होत आहे. याच दिवशी महाराष्ट्राचे अध्यात्मिक दैवत विठुरायाची आषाढी एकादशीही आल्याने या दिवशी बकरी ईदची कुर्बानी न देता एकादशीनंतर सण साजरा करण्याचा निर्णय नंदुरबार जिल्ह्यतील मुस्लीम समुदायाच्या बहुतांश लोकांनी घेतला असून राज्यात सौहार्द व सद्भावनेचे एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEW

नंदुरबारचे जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना नागरिकांनी एकोप्याचे दर्शन घडवावे, असे आवाहन केले होते. त्यास जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी प्रतिसाद देत आषाढी एकादशीच्या दिवशी हिंदू बांधवांच्या भावना जपण्यासाठी ऐक्याच्या दिशेने स्वतःहून एक पाऊल पुढे टाकले आहे. एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय ऐच्छिक असला तरी जवळपास सर्व मुस्लिम समुदायाने व मौलानांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे जिल्हाभरातून स्वागत होत असून नंदुरबार पोलीसांचे या निमित्ताने कौतुक होत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEW

सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणारे पोलीस अधीक्षक पी.आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचेसह नंदुरबार पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, अक्कलकुव्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, गृह शाखेचे पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक भारत जाधव, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस निरीक्षक राहुल पवार, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, पोलीस निरीक्षक निशामुद्दीन पठाण, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, राजन मोरे, धनराज निळे, प्रकाश वानखेडे यांनी यासाठी प्रयत्न केले.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here