गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना होणार कार्यान्वित ..

0
134

मुंबई -९/६/२३

राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, 1995 लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकामासाठी, ओझी वाहण्यासाठी व पैदाशीसाठी उपयुक्त नसलेले गोवंशीय बैल व वळू यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आलेली आहे.

परिणामी, कालांतराने शेती व दूध यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होणार असल्याने या सर्व पशुधनाचा सांभाळ, संगोपन करणे आवश्यक असल्याने शासनाने सुधारीत ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे तसेच यापूर्वी 26 एप्रिल, 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये ज्या 32 तालुक्यातील गोशाळांना अनुदान देण्यात आले आहे, ते तालुके वगळून 34 जिल्ह्यातील 324 तालुक्यांमधून प्रत्येकी 1 याप्रमाणे 324 गोशाळांची अनुदानासाठी निवड करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

हे सुध्दा वाचा:

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगांव (अक्राणी) या तालुक्यांची गोवर्धन गोवंश सेवा केंद्रासाठी निवड करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यात सन 2017 च्या योजनेत पांजरपोळ गोशाळा सेवा मंडळ, कोठडे, ता.नवापूर या संस्थेस अनुदान मंजूर करण्यात आले असल्याने सुधारीत योजनेमध्ये नवापूर तालुका वगळण्यात आला आहे.

असे असेल अनुदान

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजने अंतर्गत 50 ते 100 पशुधन असलेल्या गोशाळेस 15 लाख, 101 ते 200 पशुधन असलेल्या गोशाळेस 20 लाख आणि 200 पेक्षा अधिक पशुधन असलेल्या गोशाळेस 25 लाख एवढे अनुदान प्रथम टप्प्यात 60 टक्के व निर्धारीत निकषाच्या पूर्तीनंतर द्वितीय टप्प्यात 40 टक्के अनुदान अर्थसहाय्य म्हणून देण्यात येईल.

मुंबई व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यातील अनुत्पादक, भाकड गायी व गोवंश असल्यास, त्यांना लगतच्या ठाणे जिल्ह्यातील यापूर्वी अनुदान मंजूर केलेल्या, त्याचप्रमाणे अनुदानासाठी निवड करण्यात येणाऱ्या गोशाळेकडे वर्ग करण्यात यावे.

योजनेचा उद्देश

दुग्धोत्पादनास, शेतीकामास, पशु-पैदाशीस, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या, असलेल्या गाय, वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे. या पशुधनासाठी चारा, पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करुन देणे. गोवर्धन गोवंश सेवा केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे. गोमूत्र, शेण इ. पासून विविध उत्पादने, खत, गोबरगॅस व इतर उप-पदार्थांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे.

कृत्रिम रेतनाने पैदास झालेली नर वासरे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या मागणीनुसार गोठीत रेतन प्रयोगशाळेसाठी नाममात्र दराने उपलब्ध करुन देण्यात येईल. कृत्रिम रेतनाने पैदास झालेली उर्वरीत नर वासरे व कालवडी यांची मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना विक्री करण्यात येतील.

हे सुध्दा वाचा:

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

संस्थेमधील पशुधनामध्ये आंतरपैदास झाल्यास निर्माण होणाऱ्या नर वासरे, कालवडी यांची वाढ खुंटणे, कालवडी उशिरा माजावर येणे, वेळीच गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे इत्यादी विपरीत परीणाम होऊ शकतात.

कृषि पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हास्तरीय विविध योजनांमधून, चारा उत्पादनांच्या योजनांमधून या गोशाळांना वैरण लागवडीसाठी बियाणे, खते, ठोंबे, हायड्रोपोनीक, वाळलेला चारा उत्पादन, ओला चारा उत्पादन करण्यासाठी लाभ अनुज्ञेय राहतील.

याशिवाय या गोशाळांनी रुग्ण पशुधनास आवश्यक असलेल्या पशुवैद्यकीय सेवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत उपलब्ध करुन द्यावीत. “सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र” या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज व माहितीसाठी उपआयुक्त जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा.

हे सुध्दा वाचा:

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here