माय चाईल्ड स्कुलमध्ये ग्रॅज्युएशन सेरोमनी

0
117

बालकांच्या गुणांना वाव देण्यासाठी उपक्रम

नंदुरबार येथील माय चाईल्ड प्ले स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन सेरेमनीचा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

a23e8847 fdd8 46d8 8252 537e690e1f23

लहान वर्गातून मोठ्या वर्गात जाण्यासाठी विद्यार्थ्याना उत्तेजन मिळावे, या उद्येशाने पदवीची कॅप व
ड्रेस घालून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सुट्यांमध्ये मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष न होता त्यांना ज्ञानाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी “ब्रिज कोर्स ‘हया कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मिनाक्षी जगताप व रिना निकुभे उपस्थित होते.

माय प्ले स्कूलच्या संचालिका पुजा वाणी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या को-ऑर्डिनेटर सोनल शहा यांच्या मार्गदशनाखाली शिक्षिका मोहिनी घडमोडे, पौर्णिमा कासार, ओजस्विता सोनवणे, वृशाली पाटील, माधुरी माळी, अर्पणा देवरे,उज्वला शहा, सारिका दाते व विनोद भालेराव यांनी परिश्रम घेतले.

जीवन पाटील, कार्यकारी संपादक एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here