Nandurbar News Today :  6.50 लाखाची लाच स्वीकारताना ग्रामसेवक अप्पा रंगेहाथ..!

0
134
Nandurbar News Today Gram sevak red handed while accepting bribe of 6.50 lakhs

Nandurbar News Today – ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचे बिल काढण्यासाठी साडेसहा लाखाची लाच स्वीकारतांना ग्रामसेवकासह खाजगी इसमास रंगेहात पकडण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास.

अक्कलकुवा तालुक्यातील सिंधुरी ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, पेवर ब्लॉक बसविणे असे विविध प्रकारची ग्रामपंचायतीचे मजूर कामे तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केली होती. या कामांचे बिल 32 लाख 34 हजार रुपये झाले होते. सदर कामाचे बिल देण्यासंदर्भात सिंदुरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी बिलाच्या 20% रक्कम म्हणजे 6 लाख 47 हजार रुपये लालचेची मागणी केली. ( Nandurbar News Today )

Akkalkuwa Gram sevak red handed while accepting bribe Nandurbar News Today

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान सदरलालचेची रक्कम स्वीकारताना ग्रामसेवक मनोज पावरा व खाजगी इसम लालसिंग सिंगजी वसावे राहणार गमन तालुका अक्कलकुवा या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

Akkalkuwa Gram sevak red handed while accepting bribe Nandurbar Nandurbar News Today

सदरची कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिंष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी, पोलीस हवालदार विलास पाटील, देवराम गावित, पोलीस नाईक संदीप नावडेकर, हेमंत महाले, जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली आहे.

Gram sevak red handed while accepting bribe Nandurbar news today

शुभम भंसाली – अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here