नंदुरबार -५/४/२३
तळोदा शहरात जैन समाजाचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण दिनानिमित्त जैन समाजातर्फे जन्मकल्याणक महोत्सव उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यानिमित्ताने जगाला सत्य अहिंसा परमोधर्माच्या , जिवो ऑर जिणेदोचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले.
जैन समाजातर्फे वरघोडा व शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेत फुलांनी सजविलेले ट्रॅक्टर वर भगवान महावीर ची प्रतिमा ठेवण्यात आली
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
शहरातील मुख्य मार्गावरून स्मारक चौक मेन रोड बस स्थानक आनंद चौक व शहराच्या इतर प्रमुख मार्गावरून शोभायात्रा जैन मंदिराजवळ आल्यानंतर तेथे शोभा यात्रेच्या समारोप करण्यात आला
शोभायात्रेत पांढऱ्याशुभ्र वस्त्रधारी भगवा फेट्यातील युवक व गुलाबी फेट्यातील युवतीनी भगवान महावीरांच्या जयजयकार करीत अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध रीतीने निघालेल्या शोभायात्रेने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
शोभा यात्रेनंतर जैन समाजातर्फे महाप्रसाद भंडारा महावीर प्रसादी चे आयोजन करण्यात आले होते
आणि प्रसादीच्या जवळ जवळ पंधराशे लोकांनी महाप्रसादाच्या लाभ घेतला.
तळोदा शहदा आमदार राजेश पाडवी, डॉक्टर शशिकांत वाणी, उपनगराध्यक्ष भाग्यश्रीताई चौधरी,मा.नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी,योगेश चौधरी, श्याम राजपूत , कैलास चौधरी, शिरीष माळी यांच्यासह इतर राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन जैन बांधवांना भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी जैन मंदिरात भक्ती संध्या भजन कीर्तनाच्या धार्मिक कार्यक्रम सपन्न झाला.
या कार्यक्रमात जैन समाजाचे प्रवीण जैन ,कांतीलाल जैन, राजेंद्र जैन, गौतम जैन, दिलीप जैन, सुभाष जैन, गौतम बोथरा, सुभाष चोपडा,अशोक चोपडा ,प्रकाश कोचर,धनराज जैन ,नरेश कोचर ,हेतन शहा,ऍड अल्पेश जैन,डॉ पंकज जैन,डॉ संदीप जैन,डॉ जिग्नेश देसाई, हुकुमचद जैन, संतोष भंडारी ,अनिल कोचर महावीर जैन, मुकेश जैन जितेंद्र बोथरा,मनीष जैन,दिपेश जैन, मनीष शहा, राहुल जैन, गौरव जैन, सुरेश जैन आदी जैन बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तळोदा जैन समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
महेंद्र सूर्यवंशी, तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज..