धुळे: नेर गावात संजय ढबुशेठ जयस्वाल यांच्या स्मारकाचे शानदार अनावरण | Grand unveiling of Sanjay Dhabusheth Jaiswal’s memorial

0
429
Sanjay Dhabusheth Jaiswal

धुळे: धुळे तालुक्यातील नेर येथील स्व:संजय ढबुशेठ जयस्वाल (Sanjay Dhabusheth Jaiswal) यांच्या स्मारकाचे शानदार अनावरण मान्यवरांची हस्ते करण्यात आले.

तसेच नेर गावाचे माजी सरपंच तथा धुळे पं.स.चे माजी उप सभापती स्व:संजय (ढबुशेठ) दुर्गादिन जयस्वाल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज सकाळी 11 वाजता शानदार लोकापर्ण करण्यात आले कर्यक्रमत विविध पक्षाचे आजी- माजी लोकप्रतििधींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

नेर येथे लोणखेडी फाट्याजवळ स्व:(ढबुशेठ) दूर्गादिन जयस्वाल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकापर्ण कार्यक्रम झाला.अध्यक्षांनी नंदुबारचे माझी आमदार चंदकांत रघुवंशी होते.यावेळी स्मारकाचे अनावरण धुळे ग्रामीणचे आमदार कुणाला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

download

कार्यक्रमास माजी आ.प्रा.शरद पाटील.महिला काँग्रेस अध्यक्ष नेर गावाचे सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल. धुळे बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील,नाशिक म्हाडाचे माजी सभपती किरण शिंदे,काँग्रसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ,जि.प.सदस्य किरण पाटील आपीआय जिल्हाअध्यक्ष शशिकांत वाघ,नगर सेवक जितेंद्र शिरसाठ,जिभाऊ धिवरे, महेश मिस्तरी, नगरसेवक हिरामण गवळी,साबीर शेख, सुनील बैसाणे,संजय शर्मा

साक्रीचे माजी सरपंच नाना नागरे जव्हार सूतगिरणीचे संचालक प्रमोद जैन, जि.प.सदस्य गोकुळसिंह परदेशी,जि.प.सदस्य आनंद पाटील,भगवान पाटील,संग्राम पाटील,माजी जि.प.सदस्य अरविंद भोसले,पं.स.सदस्य अंजनाबाई मोरे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर,शिवशेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी,काँग्रेसचे धुळे तालुकाध्यक्ष अशोक सुडके,मुकटीचे माजी सरपंच पंढरीनाथ पाटील,वार गावाचे माजी सरपंच दरबारसिंह गिरसे,खरेदी-विक्री संघाचे लहू पाटील,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे,बाजार समितीचे सदस्य गुलाब कोतेकर,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गर्दे,बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील आदीसिंह उपस्थित होती.

सुरुवातीला राजुजी झा गुरुजी यांचा यांचा भजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर लोकापर्ण सोहळा पार पाडला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.स्व:ढबुशेठ हे नेरग्रामपंचायती वर15 वर्षे सरपंच पदीविराजमान होते,तर अडीच वर्षे धुळे पंचायत समितीचे उपसभापती होते.त्यांना आपल्या कार्यकाळात गाव परिसराच्या विकासाला चालना दिली.आपल्या कार्यकर्तुत्वाने हे परिसरात अतिशय लोकप्रिय होते.राजकारणासोबत समाजकार्यातही त्यांनी ठसा उमटविला.

समाजातील अनेक गरजवंतांना त्यांनी मदत केली. स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या आदर्शवत कार्याला नेहमीच उजाळा मिळत राहील,अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन महिला काँग्रेस अध्यक्षातथा नेर गावाच्या सरपंच गायत्रीदेवी संजय जयस्वाल,स्वप्नील संजय जयस्वाल,सुमित संजय जयस्वाल,सागर संजय जयस्वाल व जयस्वाल परिवाराने केले कार्यक्रमास नेर ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here