नाशिक -१५/४/२३
मेघवाळ समाज उन्नती मित्र मंडळाच्यावतीने महामानव,भारतरत्न, विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेडक्रॉस रविवार कारंजा येथे अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव,माजी नगरसेविका हेमलता पाटील,मेघवाळ उन्नती मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश मारू,कामगार नेते सुरेश दलोड, सचिन दीक्षित, रमेश मकवणा, प्रमोद मारू,देवेन मारू मोठ्या संख्येने समाज बांधव,भीम सैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी शहरात बाईक रॅली काढण्यात आली..
या रॅलीने नाशिककरांचे लक्ष वेधले ..
तसेच शालिमार येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले.एकूणच विविध सामाजिक ,राजकीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी महामानवास अभिवादन केले ..
तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज नाशिक