कोकणी हिल पोलीस चौकीचे भूमीपूजन…

0
199

नंदुरबार :०४/०३/२०२३

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर पोलीस ठाणे अंतर्गत दुधाळे शिवारातील कोकणी हिल येथे पोलीस चौकीचे भूमीपूजन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक.डॉ. बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील कोकणी हिल ही दुधाळे शिवारातील वसाहत परिसर असून चोरीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसापासून वाढ झालेली आहे.
तसेच येथे किरकोळ कारणावरून बऱ्याच वेळा छोटेमोठे वाद होत असतात.
या सर्व गोष्टींचा त्रास वयोवृध्द्, महिला, शाळेत जाणारे विद्यार्थी, व्यावसायीक व सामान्य नागरिकांना होत होता.
त्यामुळे कोकणी हिल परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना समक्ष भेटून त्यांना होणाऱ्या त्रासा बाबत सविस्तर माहिती दिली होती.

 पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांनी या सर्व बाबींचा आढावा घेवून कोकणी हिल परिसरात पोलीस चौकी उभारणी बाबत  पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांना सांगितले. 

त्याप्रमाणे नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर कोकणी हिल पोलीस चौकी उभारणीबाबत कारवाई करत कोकणी हिल परिसरातील शंकर हरी नगर मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत पोलीस चौकी बाबत ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामस्थ यांचेशी चर्चा करुन पोलीस चौकी बाबत प्रस्ताव पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना सादर केला.
त्यांनी देखील त्यावर तात्काळ कारवाई करत पोलीस चौकी उभारणीसाठी परवानगी दिली.

हे हि वाचा : https://bit.ly/3Jd3tbm

त्यानुसार कोकणी हिल परिसरातील शंकर हरी नगर मधील 3873 स्के.फु भुखंडचा 8-अ चा उतारा ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामस्थ यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडे सुपूर्त करुन दिनांक 01 मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर पोलीस ठाणे अंतर्गत दुधाळे शिवारातील शंकर हरी नगर मध्ये कोकणी हिल येथे पोलीस चौकीच्या जागेचे धार्मीक विधी व परंपरेनुसार पूजा करुन पोलीस चौकी बांधकामाचे भूमीपूजन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल व लोक सहभागातून पोलीस चौकी उभारणी बाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी भूमीपूजनप्रसंगी दुधाळे गावाचे सरपंच अश्विनी मालचे, ग्रामसेवक . दौलत कोकणी, पंचायत समिती सभापती छाया मालचे, प्रतिष्ठीत नागरिक ताराचंद मालचे व सर्व नागरिकांचे आभार मानले .

तसेच कोकणी हिल परिसरात जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी राहात असल्यामुळे सुट्टयांमध्ये शासकीय कर्मचारी आपल्या गावी जात असतात, त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. कोकणी हिल पोलीस चौकीमुळे नागरिकांना वेळीच मदत होवून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात मदत होईल असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक.पी.आर.पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच पोलीस चौकी साठी जागा उपलब्ध करुन दातृत्व दाखविल्याबद्दल समस्त दुधाळे शिवारातील नागरिक, ग्रामसेवक, सरपंच व इतर मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

कोकणी हिल परिसरात पोलीस चौकीचे भूमीपूजन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सदर कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक.डॉ. बी.जी.शेखर पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पंचायत समिती सभापती छाया मालचे, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.

प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here