दक्षिण मुखी मारुती मंदिर: चार दिवसीय कीर्तन महोत्सव व रक्तदान शिबीर..

0
109

शिंदखेडा /धुळे -१०/४/२३

तालुक्यातील पिलखोड येथील गुरु गोरक्षनाथ आखाडा दक्षिण मुखी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त चार दिवस कार्यक्रमात किर्तन सोहळा, रक्तदान शिबीर आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

चैत्र महिन्यात रामनवमी उत्सवानंतर आज देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला .

हनुमान जयंती म्हणजे भगवान हनुमान यांचा जन्मोत्सव, चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला सांगितली जाते.

त्यामुळे दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेस हनुमान जन्मोत्सव ठिकठिकाणी साजरा केला गेला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

त्यानिमित्ताने पिलखोड येथील गुरू गोरक्षनाथ आखाडा दक्षिणमुखी मारुती मंदिरात चैत्र शुद्ध पौर्णिमा गुरुवार दिनांक ६ एप्रिल ते चैत्र वैद्य तृतीय रविवार ९ एप्रिल पर्यंत हनुमान जन्मोत्सवानिमित्त दि ६ एप्रिल शुक्रवारी ह भ प परमेश्वर महाराज उगले (नांदगावकर), दि ७ एप्रिल ह भ प देवगोपालजी शास्त्री महाराज (आडगावकर), दि ८ व ९ एप्रिल शनिवारी व रविवारी ह भ प वैराग्यमूर्ती हरिदास महाराज शिंदे (सोलापूरकर) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २३ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले .

ह्यावेळी पन्नास हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

दात्यांना प्रमाणपत्र व संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा भेट दिली.

यासाठी धुळे येथील नवजीवन ब्लड ग्रुप चे संचालक डॉ. सुनील चौधरी, जनसंपर्क अधिकारी दिपक सोनार, गजानन चौधरी, पांडुरंग गवळी, प्रवीण पाटील, योगेश पाटील, संजय धनगव्हाळ यांचे सहकार्य लाभले.

महाप्रसादाचा लाभ भक्त भाविकांनी घेतला.

या कार्यक्रमांना महाराष्ट्रातील सर्व नाथ साधू संन्यासी व सर्व संस्थानिक मठाधिपती महानुभव, महाराष्ट्रातील सर्व गुणीजन वारकरी महाराज , वारकरी शिक्षण संस्थेतील आळंदी येथील सर्व आजी-माजी विद्यार्थी ,संत सावता बालगोपाल भजनी मंडळ शिंदखेडा व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ उपस्थित राहणार उपस्थित होते.

जन्मोत्सवानिमित्त आयोजक मठाधिपती योगी दत्ता नाथजी महाराज यांसह भक्त भाविकांनी परिक्षम घेतले.

पिलखोड मंदिर परिसरात जवळपास विविध प्रकारच्या पाचशे रोपट्याचे वृक्षारोपण करण्यात आले असून सर्व वृक्ष जगविले आहेत.

त्यात संजय महाजन सर यांनी देखील वड पिंपळाची दोनशे वृक्ष लागवड केली आहे.

यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here