वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीतील व्यासांच्या तळघरात हिंदू पक्षाला पूजा करण्याचा अधिकार दिला आहे.
Gyanvapi News Update : वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात बुधवारी जिल्हा न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात हिंदू आणि मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने हिंदूंना ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासांच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानवापी मशिदीमध्ये एक तळघर आहे, ज्यामध्ये सोमनाथ व्यास देवाच्या मूर्तीची पूजा केली जात होती. आता विश्वनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी या तळघरात पूजा करावी आणि बॅरिकेड्स हटवण्याची व्यवस्था करावी, असे जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी तळघरात पुजेची परवानगी मागितली होती. 17 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाने व्यासांच्या तळघराचा ताबा घेतला होता. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान हे तळघर स्वच्छही करण्यात आले होते.
न्यायालयाने आदेशात काय म्हटले…?
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटले की, व्यासांच्या तळघराचा ताबा वाराणसीचा जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे आला आहे, त्यामुळेच विश्वनाथ मंदिराचे पुजारी ते तळघर स्वच्छ करुन तिथे नियमित पूजा करतील. तिथे लावलेले बॅरिकेडिंगहीं हटवण्याचे निर्देश दिले आहेत. वाराणसी न्यायालयाने सोमनाथ व्यास यांच्या कुटुंबीयांना या पूजेचा अधिकार दिला आहे.
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
तळघरातील पूजा 1993 मध्ये बंद करण्यात आली…?
ज्ञानवापी मशिदीमध्ये एक तळघर आहे, ज्यामध्ये सोमनाथ व्यास देवतेच्या मूर्तीची पूजा करत असत. डिसेंबर 1993 मध्ये राज्याच्या तत्कालिन मुलायम सिंह यादव सरकारच्या तोंडी आदेशानुसार, तळघर सील करण्यात आले आणि तळघरात पुजा करण्यास मनाई करण्यात आली. नंतर तिथे बॅरिकेड लावण्यात आले. तळघर 1993 पासून बंद होते आणि तळघराची चावी वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे संरक्षक म्हणून ठेवण्यात आली होती. 2016 मध्ये सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल करून त्यांची मालमत्ता परत करण्याची मागणी केली होती.