चोपडा -३१/३/२३
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सध्या गव्हू काढणीला सुरवात झाली ..
असून बाजारात पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये कमालीचे नाराजी पसरली आहे.
यावर्षी गव्हाचे पाहिजे तसे उत्पन्न निघत नसल्याने गव्हू उत्पादक शेतकर्यांचे लावलेला खर्च जेमतेम निघणार असे शेतकर्यांमध्ये बोलले जात आहे.
यावर्षी गव्हाचे पेरा कमी असल्याने शेतकर्यांना चांगला भाव मिळेल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
कारण एक ते दोन महिन्यापुर्वी याच गव्हाला व्यापारी हे साडे तीन हजाराच्या पुढे विकत होते.
आता कुठे तरी शेतकर्यांच्या घरात गव्हाचे उत्पन्न यायला सुरुवात झाली तेवढ्यात बाजारात गव्हाचे भावात कमालीची घसरण झाल्यामुळे शेतकर्यांच्या मनात शासन विषयी चिड निर्माण झाली आहे.
आत्माराम पाटील,चोपडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्युज…