भावाचा खुनाचा असा घेतला त्यांनी बदला … चौघांना पोलिसांनी केली अटक

0
1174

नंदुरबार :- भावाचा खून करून वर्षभर जेलमध्ये असलेला व काही दिवसांपूर्वी जामिनावर घरी आलेल्या संशयिताचा खून करण्यात आल्याची घटना धडगाव तालुक्यातील बिजरी येथे घडली आहे. भावाचा खूनाचा बदला म्हणून सात जणांनी त्याला बेदम मारहाण करून जीवे ठार केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील बीजरी येथे रुमा तडवी याने भरत वळवी याचा खून केल्याने त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाल्याने तो जेलमध्ये होता. हि घटना मागीलवर्षी घडली होती. वर्षभर जेलमध्ये असलेला रुमा तडवी हा नुकताच जेलमधून जामिनावर घरी आला होता. मयत भरत वळवी याचा खून झाल्याने भावाचा बदला घेण्यासाठी लालसिंग वळवी व इतर सहा जणांनी कट रचला.

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS

कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS

नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेश असताना धडगाव तालुक्यातील बिजरी जुनापाटीलपाडा येथे गैरकायद्याची मंडळी जमवून लसिंग वळवी व इतर सहा जणांनी रूमा उतऱ्या तडवी ( ४९ रा. बिजरी वाघबारीपाडा ता.धडगाव यास बेड मारहाण केली. त्यास लोखंडी रॉड, लाठ्या काठ्या, डेगाऱ्याने मारहाण करीत त्याचा खून केला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याबाबत आशा रूमा तडवी ( रा.बिजरी वाघबारीपाडा ता.धडगाव ) यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात लालसिंग खेमा वळवी, शिवाजी खेमा वळवी, दामा खेमा वळवी, रागा खेमा वळवी, सिमा खेमा वळवी, मालसिंग भरत वळवी, अनिल भरत वळवी ( सर्व रा.बिजरी वाघबारीपाडा ता.धडगाव ) यांच्याविरुद्ध भादवी कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ सह.महा.पो. अधी ३७ (१) (३) चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. तपास पोनि आय.एन.पठाण करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज नवापूर – नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here