मुंबई -२९/६/२३
HEAVY RAIN: राज्यातील काही भागांसह मुंबईत (Mumbai) शनिवारपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत जागोजागी पाणी (Water) साचल्याचे चित्र दिसत होते. तर काही ठिकाणी इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. अशा विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे…
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोवंडी, विलेपार्ले आणि विद्याविहार या भागांत सहा जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. सतत तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील बोरिवली, दहिसर आणि जोगेश्वरी भागात घरे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे घरातील टीव्ही आणि फ्रीजही वाहून गेल्याचे दिसून आले. तर विद्याविहार येथील ४० वर्ष जुन्या दुमजली इमारतीचा भाग रविवारी कोसळला होता. त्यावेळी ढिगाऱ्याखाली (Under the Rubble)दोन जण अडकले होते. त्यानंतर २० तासानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हे सुध्दा वाचा
नंदुरबार पोलिसांनी रोखला अजून एक बालविवाह … पळून जावून विवाह करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचे केले समुपदेशन ! | MDTV NEWS
Nandurbar Police… कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १२८ गोवंशाची केली सुटका…! | MDTV NEWS
तसेच विलेपार्ले (Vileparle) परिसरात देखील रविवारी इमारत कोसळल्याची (Building Collapsed) दुर्घटना घडली होती. त्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गोवंडीमध्ये (Govandi) मॅनहॉलमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी उतरलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दरम्यान, हवामान विभागाने (Meteorological Department) येत्या दोन दिवसांत किनारपट्टी भागात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तर पुढील ४८ तासांत मुंबई, ठाणे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे आता नागरिकांना घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट सोबत ठेवावा लागणार आहे.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई