तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी

0
179

तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. सततच्या जोरदार पावसामुळे सातपुड्यातील नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आहे. तळोद्यात नदीचे पाणी बार्ली हट्टीत शिरल्याने त्या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झाल्याचे वृत्त असून अद्याप प्रशासन पोहचले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा व तळोद्यात वरुणराजा मनसोक्त बरसतो आहे. त्यातच गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.

तळोदे शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून पाऊस सतत पडत असल्याने शहरातील बार्ली हट्टीतील आदिवासी बांधवांच्या घरात व घराबाहेरील रस्त्यावर पाणी वहात असुन सदर पाण्याच्या निचरा होणाऱ्या गटारी तुडुंब भरल्याने व पावसाचे पाणी पुढे वहात जात नसल्याने येथील रहाणाऱ्या नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेने शहरातील बार्ली हट्टी येथील गटारींची पाहणी करून त्या मोकळ्या कराव्यात, पाणी वाहण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सातपुड्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे सर्वच नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. पुराचे पाणी पुलावरून जात असल्याने वाहतूक ठप्प होऊन अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. पावसाचे पाणी काही शेतांमध्ये शिरल्याचे वृत्त असून यामुळे आदिवासी बांधवांच्या शेतीचे तसेच खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, अद्याप महसूल विभागाचा कोणताही अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचला नसल्याची खंत येथील आदिवासी बांधवानी केली आहे.

महेंद्र सूर्यवंशीसह शुभम भन्साली एमडीटीव्ही न्युज तळोदा, अक्कलकुवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here