महाराष्ट्रातील या जिल्ह्यात उद्यापासून मुसळधार पाऊस !

0
277

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील पाच दिवस काही ठिकाणी मेघ गर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सून आता सक्रिय होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

महाराष्ट्रात काही भागात पाऊस झाला आहे, त्यानंतर आलेल्या बिपरजॉय वादळाने लोकांची चिंता वाढविली आहे. मान्सून कुठे गेला, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली. भारतीय हवामान खात्याने (IMD) गुरुवारी महाराष्ट्र आणि इतर राज्यात २३ जूनपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असे भाकीत वर्तविले आहे. मुंबई आणि कोकणमध्ये काही भागात ढगाळ वातावरण अजून तुरळक पाऊस (Weather Alert) होत आहे. देशात वातवरण पूर्णपणे बदललं असून तापमानात वाढ होताना जाणवत आहे.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEW

हवामान विभागाने माहिती दिली आहे की, महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्रात हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडासहीत अनेक ठिकाणी वीजेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर नंदुरबार आणि जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि जवळच्या ठिकाणी पाऊस होणार असल्याचं सांगितलं आहे.तर सांगली, सोलापूर, बीड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस होणार नाही. या जिल्ह्यांमध्ये लोकांना तापमानाचा सामना कारावा लागण्याची शक्यता आहे.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEW

भारतीय हवामान खात्याने १८ जून ते २१ जून या कालावधीमध्ये दक्षिण, पश्चिम मान्सून पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. परंतु या काळात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. २३ जूनपासून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मान्सून विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी सांगितलं की, महाराष्ट्रापासून केरळपर्यंत अरबी समुद्रात दबाव वाढल्यानंतर मान्सून पुढे सरकेल. १८ से २२ जूनपर्यंत पुणे आणि मुंबईमध्ये मान्सून प्रवेश करेल. राज्यात उत्तर भागात आणि विदर्भात मान्सून पोहोचण्यासाठी वेळ लागेल.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार – मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here