शहरात भव्य -दिव्य शिवस्मारक उभारण्याचा संकल्प – हेमंत साळुंखे

0
148

शिंदखेडा : १०/३/२०२३

येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत असून आज शिंदखेडा मध्यवर्ती कार्यालयात ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ह्यावेळी तालुकाप्रमुख गिरीश देसले, विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी, जिल्हा उपसंघटक भाईदास पाटील, कृउबाचे संचालक सर्जेराव पाटील, रमेश बोरसे, समन्वयक विनायक पवार, युवासेना अधिकारी प्रदीप पवार, शहरप्रमुख संतोष देसले, उपशहरप्रमुख मनोहर गिरासे , सरपंच लक्ष्मीकांत साळुंखे, किशोर पवार, यादवराव सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक पक्षांच्या नेत्यांनी शहरात शिवस्मारक उभारण्यासाठी आश्वासन देत गेले .

परंतु ते फक्त पोकळ आश्वासने देऊन शिवप्रेमी व शहराला आशेवर ठेवले .

मात्र आज शिवजयंती चे मुहूर्त साधून खऱ्या अर्थाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मनातील भावना व खंत लक्षात घेऊन जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी शिंदखेडा शहरात किंवा पाटण चौफुली वर शिवस्मारक उभारण्याचा संकल्प केला. सर्वसमावेशक जागा निश्चित केली जाईल.

नंतर नामांकित वास्तुविशारद कडुन आराखडा तयार करून आकार दिला जाईल असे पदाधिकारीच्या बैठकीत ठरले. शिवस्मारक उभारण्याच्या जनतेच्या मनातील आशा पल्लवित होतील.

यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here