नंदुरबार : ७/३/२०२३
३३ वर्षांपासून पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याची परंपरा जपली आहे नंदुरबारच्या शहीद शिरीष कुमार मित्र मंडळांना..
निसर्गाचा अनमोल ठेवा कायम राखण्यासाठी शेणाच्या गौर्या कापडी चिंध्यांचा वापर करून लाकूड रहित पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याची परंपरा नंदुरबार येथील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळाने राखली..
मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय विठ्ठलराव हिरणवाळे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबवण्यात येतो..
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाडी यांच्या संकल्पनेतून ही होळी साजरी होते..
सर्वप्रथम बालवीर चौकात होळी प्रज्वलित होते..
महाविद्यालयीन युवतींच्या हस्ते तुळशी आंबा कडुलिंब पेरू आदी वृक्षांची विधिवत पूजा होते..
या रोपांची लागवड करून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या माध्यमातून देण्यात येतो..
बालाजी वाडा येथून मंडळाचे कार्यकर्ते गोपाल हिरणवाळे मशाल पेटवून आणतात..
बालवीर चौकात होळी त्या मशालीच्या साह्याने प्रज्वलित केली जाते..
विद्यार्थिनी व सुवासिनी महिलांच्या उपस्थितीत पावसाळी वातावरणातही वृक्षपुजनासह होलिकोत्सव साजरा करण्यात आला.
पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात एकमेव पर्यावरण पूरक होळी साजरी करणारा जर कुठली संस्था असेल तर ते अग्रक्रमानं नाव घ्यावे लागेल शहीद शिरीष कुमार मित्र मंडळाचे..
या संपूर्ण कार्य उपक्रमाची धुळे येथील निसर्ग मित्र समितीने दखल घेऊन 2019 मध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.. तसेच मंडळातर्फे जलबचतीचे महत्त्व दरवर्षी सांगण्यात येतं..
यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार महादू हिरणवाळे यांनी आपली एम डी टी व्ही शी बोलतांना प्रतिक्रिया दिलीय ..
ज्येष्ठ सल्लागार जी एस गवळी ,बि.डी गोसावी ,संभाजी हिरणवाळे ,संजय चौधरी, कैलास ढोले ,भास्कर रामोळे, अंकुश ढोले ,सदाशिव गवळी, काशिनाथ गवळी ,विशाल हिरणवाळे ,धीरेन हिरणवाळे ,अमेश कासार ,प्रफुल्ल राजपूत, दिग्विजय रघुवंशी यांचा सक्रिय सहभाग असतो..
त्यामुळे या मित्रमंडळाने साजरी केलेली होळी इतरांसाठी आदर्श ठरावी अशीच म्हणावी लागेल..
या मंडळाचे अध्यक्ष पत्रकार महादू हिरणवाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं कौतुक केलं ते कमीच..
प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम.डी. टी.व्ही न्यूज