मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनतर्फे सत्कार..

0
147

नंदुरबार :१३/३/२३

राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना संपर्कप्रमुख व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या नंदुरबार जिल्हा संघटकपदी सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी यांची निवड झाली.

याबद्दल मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनतर्फे कन्यादान मंगल कार्यालयाचे संचालक संदीप चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनी प्रास्ताविक केले.
या सत्कार प्रसंगी कार्यक्रमास मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संजय भदाणे, कार्याध्यक्ष किरण चौधरी, उद्योजक जगदीश शितपाल, जेठमल अंबानी, सुरेश मंगा चौधरी, दगा चौधरी, सुनील चौधरी, प्रेमचंद राजपूत, नरताप गोसावी, भूषण ईशी, चंदू गोसावी, गणेश जावरे, किरण भोई, संतोष देवळालीकर यांच्यासह मंगळ बाजार परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

pravin chavhan
प्रविण चव्हाण ,जिल्हा प्रतिनिधी ,एम. डी. टी. व्ही नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here