कोरीट मंडळातील ११८ शेतकरी महिलांचा सन्मान… कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत कार्यक्रम !

0
293

नंदुरबार :- कृषी विज्ञान केंद्र कोळदा व मंडळ कृषी अधिकारी कोरीट (ता.जि.नंदुरबार) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथे कृषी महिला शेतकरी सन्मानदिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी कोरीट कार्यक्षेत्रातील ११८ कर्तृत्ववान महिलांनी सहभाग घेतला. सर्व ११८ महिलांचा सन्मान करण्यात आला.

हे सुध्दा वाचा

बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEW

कार्यक्रमास कृषी आयुक्तालय पुणे येथील मुख्य सांख्यिकी अधिकारी डी.बी.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.आर.वाणी, उपविभागीय कृषी अधिकारी सी.के.ठाकरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे, मंडळ कृषी अधिकारी उमेश भदाणे यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी कोरीट कार्यक्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.

ed1a1957 9329 42bc babc 6ae201e80b9c

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पोस्टर प्रदर्शन तसेच विविध योजनांची माहिती देण्यात आली. कृषी महिला शेतकरी सन्मान दिनात राजेंद्र दहातोंडे यांनी महिलांचा कृषी क्षेत्रातील महिलांचा सहभाग व भविष्यात सहभाग कसा वाढवता येईल याविषयी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ञ आरती देशमुख यांनी महिलांचे आरोग्य व पौष्टिक आहार याविषयी मार्गदर्शन केले. उमेश भदाणे यांनी नैसर्गिक शेती या विषयावर मार्गदर्शन केले.

हे सुध्दा वाचा

बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEW


आपत्कालीन सध्याच्या परिस्थितीत आपत्कालीन पीक परिस्थिती विषयक माहिती उपविभागीय कृषी अधिकारी सी.के.ठाकरे यांनी दिली. तर पिक विमा योजनांची माहिती जिल्हा कृषी अधिकारी राकेश वाणी यांनी दिली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार जिल्ह्यातील महिलांचा कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सहभाग पाहून भविष्यातील पेट्रोलला पर्याय इथेनॉल प्रकल्प या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उभे राहावेत अशी अपेक्षा व्यक्त करीत डी.बी.पाटील मुख्य सांख्यिकी अधिकारी कृषी आयुक्तालय, पुणे यांनी व्यक्त करून कृषी विभागाच्या युट्युब चॅनेल शेतकरी मासिक इत्यादी विषयक सहभाग वाढवण्याविषयी सूचना देऊन जिल्ह्यातील चाललेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. तदनंतर त्यांनी कृषी विज्ञान केंद्र येथील रेडिओ सेंटर, हवामान केंद्र याला भेट देऊन मंडळ कृषी अधिकारी कोरीट कार्यक्षेत्रातील अन्नपूर्णा पापड उद्योगाला भेट देऊन लाभार्थी कल्पना विनोद पाटील व विनोद रावण पाटील यांना मार्गदर्शन केले.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here