धडगाव तालुक्यात घराला आग

0
166

सातपुड्यात आगीच्या घटना थांबेना !
संसारोपयोगी साहित्य जळाल्याने आदिवासी कुटुंब उघड्यावर

नंदुरबार : सातपुड्याच्या कुशीतील धडगाव तालुक्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. भुजगाव येथील एका घराला काल सायंकाळी आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्य खाक झाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

भुजगाव येथील सुनिल पेचरा पाडवी यांचे कुटुंब बाहेर गेलेले असतांना घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू, धान्य, महत्वाची कागदपत्रे आणि कपडेलत्ते जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

परंतु सुनिल पेचरा पाडवी यांचे घर टेकडीवर असल्याने वाऱ्यामुळे आगीने संपूर्ण घर भस्मसात झाले. आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. धडगाव नगरपंचायतीच्या अग्निशमनदलाला संपर्क केला असता तात्काळ अग्निशमन दल दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, घराचे दांड्या लाकूडसह जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सुनिल पेचरा पाडवी यांचा संसार काही मिनिटातच जळून राख झाला आहे. अंगावरच्या कपड्यांव्यतिरिक्त काहीही शिल्लक नाही. महसूल विभागाच्या वतीने सदर आगीमुळे नुकसान झालेल्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सामाजबांधवानी सढळ हातानी मदत करावी असे आवाहन भूजगावचे सरपंच अर्जुन पावरा यांनी केले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here