Dhule News : धुळे शहरातील जेबापूर रस्त्यावरील सु. माधवनगरमध्ये भरत कांबळे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 28) रात्री भरत कांबळे बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी शीतल कांबळे आणि मुले घरात होती. अचानक घरात शॉर्टसर्किट झाला आणि आग लागली. घरात जवळच अंथरूण-पांघरूण असल्याने आगीला वेग आला.
शीतल कांबळे यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना आणि मुलांना बाहेर काढले. त्यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. आगीत घरातील फ्रीज, कपडे, भांडी, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
- Trump Vs Modi : एका फोन कॉलची किंमत ५००% टॅरिफ? मोदी-ट्रम्प यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ सुरू..!
- Maharashtra Expressway – ‘समृद्धी’नंतर महाराष्ट्राला मिळणार ‘पुणे-बंगळूर’ ग्रीन फील्ड…!
- Shreyas Iyer ची प्रकृती चिंताजनक सिडनीतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू..!
- देशाचे ५३ वे सरन्यायाधीश कोण ? CJI Gavai यांनी सुचवले मोठे नाव..
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Schools चा मोठा निर्णय! एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
गावसेवक, तलाठी, आणि पिंपळनेर पोलिसांनी पंचनामा केला आहे.
या घटनेमुळे भरत कांबळे यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक संकट आले आहे. त्यांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येण्याची अपेक्षा आहे.



