नंदुरबार:२१/२/२३
कोरोना काळातील दोन वर्षानंतर मंगळवार दिनांक 21 पासून पुन्हा बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली.. नंदुरबार जिल्ह्यातील 27 केंद्रांवर परीक्षेचं नियोजन करण्यात आलंय.
फेब्रुवारी मार्च 2023 दहावी आणि बारावी परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने धोरण निश्चित केलंय.
त्यानुसार गैरमार्गांशी लढा या अभियानांतर्गत राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबवलं जातंय.
परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रा जवळील झेरॉक्स ची दुकानात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीकडून याबाबतची अंमलबजावणी केली जाते.
राज्यात एकूण 271 भरारी पथके नेमण्यात आली आहेत.
ही पथके अचानक केंद्रांना भेट देऊन पाहणी करतील. आज इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिलाच दिवशी पहिला पेपर होता.
साधारणपणे नंदुरबार जिल्ह्यात कॉपी सर्रासपणे चालते.. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये तो टाळावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली असल्याची माहिती एमडी टीव्हीशी बोलताना नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि जिल्हा पोलीस प्रमुख पी आर पाटील यांनी दिली आहे.. ऐकूया दोघे जणांनी काय भूमिका मांडली.
परीक्षा केंद्र असलेल्या जवळपासच्या ठिकाणची झेरॉक्स केंद्रे बंद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दुकानदारांना दिल्यात.
पोलिसांकडूनही या संदर्भात दुकानदारांना समज देण्यात आला आहे. कॉपी प्रकरणांवर आळा घालण्यासाठी दक्षता समितीकडून उपाययोजना करण्यात आलेले आहेत.
विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास त्याच्यावर नियमानुसार शास्ती केली जाणार आहे त्यामुळे कॉफी बहाद्दरांवर पुढील तीन वर्ष परीक्षा बंदी देखील होऊ शकते..
त्यामुळे विद्यार्थी वर्गांना तरी या संदर्भात सजग रहावं.
नंदुरबार जिल्ह्यात इयत्ता दहावीचे 139 केंद्र आहेत तर इयत्ता बारावीचे एकूण 76 केंद्र आहेत. या 27 केंद्रांसाठी त्या शाळेतीलच प्राचार्यांची शक्यतोवर केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबारचा शिक्षण विभाग यासंदर्भात ठोस पावलं उचलेल हीच अपेक्षा..
आणि नंदुरबार जिल्ह्याला कॉपीची लागलेली कीड नष्ट करण्यात प्रशासनाला यश येईल ही आशा करूया..
या बातमीसाठी निलेश अहेर, नंदुरबार शहर प्रतिनिधी, एम.डी. टी.व्हीन्यूज नंदुरबार