प्रांत कार्यालयासमोर कोळी समाजाचा अन्नत्याग सत्याग्रह..

0
165

“समाजासाठी वाटेल ते करू..जिंकू किंवा मरू” – जगन्नाथ बाविस्कर यांचा निर्धार..

चोपडा /जळगाव – १९/४/२३

चोपडा तालुक्यातील आदिवासी टोकरेकोळी जमातीच्या न्याय व हक्कांसाठी दि. ८ मे २०२३ (वार सोमवार) रोजी स.११ वाजेपासून मागण्या मंजूर होईपर्यंत अमळनेर येथील उपविभागीय (प्रांत) अधिकारी कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येने तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येणार आहे

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
, “समाजासाठी वाटेल ते करू- जिंकू किंवा मरू”, असा पक्का निर्धार चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी केला आहे.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर यांच्या हस्ते तहसीलदार अनिल गावित यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात चोपडा (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातील आदिवासी कोळी जमातीला टोकरेकोळी (एसटी) चे जातप्रमाणपत्र मिळावे, यासह इतरही मागण्या नमूद आहेत.
याप्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जगन्नाथ बाविस्कर, माजी सरपंच, गोरगावले यांनी या सत्याग्रहाबाबत माहिती दिली ..
आत्माराम पाटील, तालुका प्रतिनिधी, चोपडा,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here