दिल्ली : २७/०२/२०२३
मराठी भाषेचं सौंदर्य अटकेपार पोहोचवणारे अनेक नेते होऊन गेलेत साहित्य घेऊन गेलेत विचारवंत होऊन गेलेत..
साता समुद्रपार मराठी भाषेचं सौंदर्य आणि तिचा अभिजात दर्जा अनेक राजकीय नेत्यांसह साहित्यिकांनी पोहोचवला..
मात्र महाराष्ट्रातल्या ”या ”मराठी नेत्यांन अशा प्रकारची लज्जास्पद आणि असंवैधानिक भाषा वापरून आपण मराठीचे स्वघोषित रक्षक आहोत याचा आव आणण्याचा प्रयत्न केलाय..
हे आहेत दस्तूरखुद्द रोज मीडियासमोर येणारे, विविध विषयांवर परखड आणि जहाल मत मांडणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिल्लीतील खासदार संजय राऊत..
आज कुसुमाग्रजांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरी झाली..
मराठीचा जागर झाला.. आणि या नेत्याने महाराष्ट्राचा नेतृत्व करणाऱ्या देशाच्या राजधानी दिल्लीत माध्यमांसमोर बोलताना अशी खालच्या स्तरावरील भाषा वापरून स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी समोर दाखवली..
एकीकडे महाराष्ट्रात मराठी अस्मितेसाठी झगडणारे हे नेते यांना आपल्या मराठी भाषेचा कसा काय विसर पडतो हा प्रश्न अनुत्तरीतच राहील.. मराठी भाषेत शब्दांना अस्त्र मानलं जातं..
पण त्यांचा सर्रासपणे दुरुपयोग करताना आपलेच मराठी नेते दिसून येतात.. पाहू या असंवैधानिक भाषा वापरलेले हे खासदार..
ऐकूया काय म्हणालेत नेमकं..
आणि हे ऐकल्यानंतर निश्चितपणे त्यांच्याविषयी असलेला आदर कमी होणार आणि लोकप्रतिनिधी म्हणून नेतृत्व करणाऱ्या यासारख्या नेत्यांनी ताबा सोडला तर काय? राऊत साहेब आपल्या जिभेवर लगाम घाला.. स्वतःला स्वघोषित रक्षक म्हणून घेऊ नका?.. एम.डी.टी.व्हीकडून राऊत साहेब आपणास सबुरीचा सल्ला.. आवरा स्वतःला..
ब्युरो रिपोर्ट एमडीटीव्ही न्यूज दिल्ली