मयत पत्नीला न्याय मिळण्यासाठी पतीचे उपोषण .. त्या डॉक्टरवर का होत नाही कारवाई ? उपस्थित केला सवाल !

0
1697

तळोदा : डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने इलाज केल्याने पत्नीचा मृत्यू झाला असून न्यायासाठी विविध अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. मात्र, आमची कोणीच दाखल घेत नसून न्याय मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय नंदूरबार येथे उपोषण करणार असल्याचा इशारा मयत महिलेच्या पतीने दिला आहे. भर पावसात सुरु असलेल्या या उपोषणस्थळी मयत महिला व उपोषणकर्त्या पतीची चिमुकली देखील असल्याने त्यांची व्यथा एकूण अनेकांचे डोळे पाणावलेले दिसून आले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत बुशरा मोहसीन बागवान यांना न्याय मिळावा म्हणून शिद्रा मोहसीन बागवान हे आपल्या ३ महिन्याच्या फातिमा नावाच्या चिमुकलीला सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आई, वडील व मित्र परिवारसह लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. सदर घटना घडून ३ महिने उलटून गेले, आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, जिल्ह्या शल्यचिकित्सक यांना कित्येक वेळा भेटून लेखी निवेदन देऊन शहादा येथील डॉ.पठाण न त्यांची पत्नी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करीत आहोत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

डॉ.पठाण हे करोडपती असल्याने व माजी नगरसेवक असल्याने त्यास राजकिय वरदहस्त असल्यामुळे त्याचा ते फायदा घेऊन आमच्यावर दबाव आणत आहेत. तसेच या अगोदर ही त्यांनी समजतील व नातेवाईक यांना मी २५ लाख देतो, केस मागे घ्या अन्यथा, चांगले होणार नाही अश्या धमक्या आम्हाला दिल्या आहेत.आमच्या निवेदनाकडे किंवा लेखी तक्रारकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. म्हणून आज आम्हाला चिमुकलीसह उपोषणाला बसावे लागले आहे. जर आताही आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं तर आम्हाला जगणे मुश्किल होईल, असा इशारा उपोषणकर्त्यानी दिला आहे.

महेंद्र सूर्यवंशी. एमडी. टीव्ही न्युज, तळोदा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here