अकोल्यात अवैध सावकाराची दादागीरी … १५ दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन ; सावकारग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

0
354

अकोला :- प्रहार जनशक्ती पक्ष अकोलाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील वसू यांच्या नेतृत्वात आज सावकारग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात जाऊन त्यांना साकडे घातले. तालुक्यातील अवैध सावकार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करून याबाबतचे निवेदन अकोला जिल्हा निबंधक यांना देण्यात आले. १५ दिवसात अवैध सावकारावर कारवाई न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मुक्काम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

Nandurbar News… वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित | MDTV NEWS

Good News…नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी घेतला निर्णय…. ईदला बकरीची कुर्बानी नाही ! | MDTV NEWS

नंदुरबार पोलिसांनी रोखला अजून एक बालविवाह … पळून जावून विवाह करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचे केले समुपदेशन ! | MDTV NEWS

Nandurbar Police… कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १२८ गोवंशाची केली सुटका…! | MDTV NEWS

अकोट येथील कासट नामक अवैध सावकार शेतकऱ्यांकडून खरेदी खत व ईसार पावती तसेच कोरे धनादेश वर सही घेतो. शेतकऱ्याकडून अवाढव्य पैसे वसूल करतो. शेतकऱ्यांचे खरेदी खत, ईसार पावती, धनादेश परत न करता शेतकऱ्यांना दमदाटी करतो. तरी या अवैध सावकारावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा, आम्ही शेतकरी व प्रहार पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

Nandurbar News… वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित | MDTV NEWS

Good News…नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी घेतला निर्णय…. ईदला बकरीची कुर्बानी नाही ! | MDTV NEWS

नंदुरबार पोलिसांनी रोखला अजून एक बालविवाह … पळून जावून विवाह करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचे केले समुपदेशन ! | MDTV NEWS

Nandurbar Police… कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १२८ गोवंशाची केली सुटका…! | MDTV NEWS

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील वसू यांच्या नेतृत्वात सावकारग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेऊन अवैध सावकारांच्या जाचाबाबत चर्चा केली. तालुक्यातील अवैध सावकार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करून याबाबतचे निवेदन अकोला जिल्हा निबंधक यांना देण्यात आले.यावेळी शुभम नारे, सुरेश नारे, सावकारग्रस्त शेतकरी समितीचे प्रदेश अध्यक्ष रमेश खिरकर, अशोक सांगळे, रावसाहेब जायले, सेवकराम धुमाळे, संजय बोंद्रे, मोहन पोटदुखे, शबिर शाह यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशोक भाकरे. एमडीटीव्ही न्युज, अकोला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here