नंदुरबार: नवापूर तालुक्यातील रंगावली नदी पात्रात अवैध वाळ उपसा करतांना अज्ञात ट्रॅक्टर आढळून आले. वन पथकाने त्यांचा पाठलाग केला मात्र, वाहनासह संशयित पसार झाले. सदर क्षेत्राची तपासणी केली असता एक संशयित आढळून आल्याने वन विभागाच्या पथकाने त्यास अटक करुन काल न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची वन कोठडी देण्यात आली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याबाबत प्राप्त माहितीनुसार, वन विभागाच्या अंतर्गत असलेल्या नियत क्षेत्र प्रतापपुर कक्ष क्रमांक ६७ मधील रंगावली नदी पात्रात एका ट्रॅक्टरमधून अवैध वाळू उपसा व वाहतूक करताना आढळून आले. वन विभागाच्या पथकाने त्याचा पाठलाग केला असता संशयित पसार झाले. सदर क्षेत्रात तपासणी केली असता एक संशयित मिळून आला. त्यास अटक करून काल नवापूर न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची वन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
वन संरक्षक धुळे व विभागीय वनाधिकारी धुळे, उपवन संरक्षक नंदुरबार सहाय्यक वन संरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली व वनक्षेत्रपाल नवापूर यांच्या नेतृत्वाखाली वनपाल बोरझर ए.एम. शेख पुढील तपास करीत आहेत. हि कारवाई वनपाल कामोद संजय बडगुजर, वनरक्षक अमोल गावित, वसंत कोकणी, अजय भोये, कमलेश वसावे, कल्पेश अहिरे यांच्या पथकाने केली.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार