नंदुरबार जिल्हा परिषद स्थायी सभेत अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांचे निर्देश
नंदुरबार :- मे महिना संपण्याच्या मार्गावर असून जलजीवन मिशन अंतर्गत कामे करणाऱ्या ठेकेदारांनी दुर्गम भागातील बऱ्याच ठिकाणी विहिरींसाठी केवळ खड्डे खोदून ठेवले आहेत. पावसाळा तोंडावर असतांना विहिरी पूर्ण होणार कधी ? असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत सदस्यांनी उपस्थित केला. यावर विहिरींची कामे पूर्ण करणाऱ्या ठेकेदारांना दंड आकारा,अशा सूचना जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी दिल्या. जलजीवन मिशनची एकूण ८६० कामांपैकी ५८९ कामे सुरू असून ४८३ जणांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. २७१ जणांना दुसरी नोटीस बजाविण्यात आली असून काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना प्रती दिवस एक हजार रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात येत असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्री.बाविस्कर यांनी दिली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार जि.प.स्थायी समिती सभा अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सभापती गणेश पराडके, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह स्थायी समिती सदस्य रतन पाडवी, सी.के.पाडवी, विजय पराडके, राया मावची, ऐश्वर्या रावल, जयश्री पाटील व जि.प. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सभेत खा.डॉ.हिना गावित यांच्या तक्रारीवरुन सुमारे ३० हजार घरकुलांची चौकशी करण्यात आली होती. यातील सुरूवातीला तीन हजार घरकुलांची फेरतपासणी केली असता त्यात १ हजार २७३ घरकुले बोगस असल्याच्या शक्यतेवरुन त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यात ३५० घरकुले बोगस किंवा कसे याची चौकशी सुरू आहे तर उर्वरित ७०० ते ८०० घरकुलांच्या बोगस लाभार्थ्यांना नोटीस बजाविण्यात आली असल्याची माहिती संबंधित विभागाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सभेच्या सुरूवातीला तालुक्यातील राकसवाडे येथील आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी गेलेल्या एका आदिवासी महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांच्या चौकशी समितीने अहवाल सादर केला असून तो अमान्य असल्याचे जि.प. सभागृह विरोधी पक्षनेते रतन पाडवी यांनी सांगितले.यावर त्यांनी फेरचौकशीची मागणी केली.जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनीही या प्रकाराची फेरचौकशीच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागाच्या आढाव्यादरम्यान, गेल्या महिन्यात झालेली भरती प्रक्रीया शासनाच्या पेसा कायद्यान्वये न झाल्यानेसदरची भरती प्रक्रीया रद्द करुन नवीन भरती करण्याची मागणी सदस्य रतन पाडवी यांनी केली.
सारंगखेडा सुमारे १० हजार लोकसंख्येचे गाव असून तिथे कायमस्वरूपी एक डॉक्टर देणे अपेक्षित असतांना आरोग्य विभागाने तेथील आणखी एक कर्मचारी कमी केल्याने आरोग्य सेवेवर ताण पडत असल्याचे सदस्या ऐश्वर्या रावल यांनी सांगितले. यासोबतच थुवा ग्रामपंचायतीतंर्गत भुरीवेल पाड्यात नवीन अंगणवाडी बांधण्यात यावी, जुने धडगाव येथे गुणवत्तापूर्ण शिक्षक देण्यात यावेत, मनरेगा अंतर्गत पुढील महिन्यात सुमारे ६ हजार मजुरांसाठी कामे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.